राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना

32

🔹अध्यक्षपदी राजकुमार व्यास , सरचिटणीस वैभव बहुतुले तर संघटन मंत्री माळगावकर

✒️शेगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

शेगाव(दि.7एप्रिल): राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात येऊन या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजकुमार व्यास शेगाव, यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी दापोली जिल्हा रत्नागिरी येथील वैभव बहुतुले यांची तर राष्ट्रीय संघटन मंत्री पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ओमकार माळगावकर यांची निवड करण्यात आली. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यासमस्या सोडविण्याबाबत आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी नुकतीच एक बैठक शेगाव येथील शासकीय विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये रेल्वेने प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावर सशक्त अशी रेल्वे प्रवासी संघटना स्थापन करणे गरजेचे असल्याचे मत वैभव बहुतुले यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार एकमताने राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी शेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास यांची तर सरचिटणीस पदी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव बहुतुले यांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील बांदेवाडी येथील ओमकार माळगावकर यांची संघटनेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री पदावर एकमताने निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीची निवड लवकरच सर्वांशी विचारविमर्श करून घोषित करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला लवकरच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे रेल्वे संबंधी विविध मागण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे संघटनेचे एक शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा निर्णय या बैठकीत प्रसंगी घेण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना भेटून त्यांना रेल्वे संबंधी समस्या सोडविण्याबाबत व नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत एक निवेदन सुद्धा देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.