महावितरणच्या महा घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर  गुन्हे दाखल करा – प्रभाकर देशमुख

77

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.18एप्रिल):- मोहोळ तालुक्यामध्ये वीज बिल वसुली तसेच बचत गटांना हाताशी धरून महावितरणमधील प्रमुख अधिकाऱ्यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तसेच सहभागी बचत गटांच्या कमिशन घोटाळ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सामूहिक अपहाराचे गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याची मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर लोहिया साहेब व सोलापूर चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे लेखी निवेदन देऊन राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. 

याबाबत पुढे बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून महावितरण कंपनीने सक्तीने शेतीपंपाची वसुली राज्यभर सुरू केलेली आहे. तीन टप्प्यात झालेल्या या वसुली मध्ये महावितरण मधील सर्व स्तरातील अधिकारी, कर्मचारी यांनी महिला बचत गटाशी संगनमत करून अधिकाऱ्यांच्या पाठबळावर काही वायरमन आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून वीज बिल घेऊन सदर चे बिल मर्जीतल्या बचत गटांकडे दाखवून झालेल्या वसुली मध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन टक्केवारीचा सामूहिक भ्रष्टाचार केला आहे. यामध्ये महावितरणचे अधिकारी काही खाजगी कॉन्ट्रॅक्टर यांचे वसुली काळातील फोन कॉल रेकॉर्ड तपासून चौकशी करावी, तसेच शेतकऱ्यांनी महावितरण कर्मचाऱ्याकडे वीज बिल भरणा केलेला असतानाही बचत गटाने संकलित केल्याचा आभास निर्माण करून लाखो रुपयाचे कमिशन मिळवण्याच्या आर्थिक षडयंत्राची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, दहा दिवसात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईस प्रारंभ नाही झाल्यास येत्या २० एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसण्याचा इशाराही यावेळी प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.

यावेळी युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, तालुकाध्यक्ष कुमार गोडसे, तालुका युवक अध्यक्ष सुहास चव्हाण, अज्ञानसिद्ध माळी, नागेश कोकरे, महेश बिस्किटे गणेश डोंगरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.