एमडी कार्डिओ करिता निवड झाल्याबद्दल डॉ. शहरयार खान यांचा सत्कार

31

🔸जमाते इस्लामी हिंद ने केले सन्मानीत

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26एप्रिल):-डॉ . शहरयार सरफराज खान यांची निवड प्रवेश वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी डीएम (कार्डियो ) मध्ये झाल्याबद्दल जमाते इस्लामी हिंद संघटने तर्फे स्थानिक तातार शहा वार्डातील कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अँड. संतोष जैन, सुनील पाटील चिंचोलकर, बाळासाहेब खरुसकर, प्रा. सलमान सय्यद, ठाणेदार अमोल माळवे, डॉ . एस पी गोरे, डॉ. स्वपनिल जीवने, डॉ. प्रा. अनिल काळबांडे, प्रा. बिचेवार, प्रा.साई काळे, सिद्धार्थ दिवेकर, विरेंद्र खंदारे, नितीन सोनाळे, लक्ष्मीकांत नंदनवार, अविनाश मुन्नरवार, ज्ञानेश्वर मोरे, शेख शहाजुल, राजू गायकवाड पुंडलिक कुबडे, इंगळे, स्थानिक शाखेचे अध्यक्ष काझी जहीरोद्दीन, शेख महेमुद जनाब, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शहरयार आयटीआय निदेशक सरफराज खान यांचे चिरंजीव आहेत. शहरयार यांचे प्राथमिक शिक्षण उमरखेड येथे झाले . ते दहावीत मिरीट मध्ये उत्तीर्ण झाले होते.अकरावी बारावीचे शिक्षण त्यांनी गो .सी. गावंडे महाविद्यालयात पूर्ण केले.बारावीत पण ते मिरीट श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते याचे श्रेय महाविद्यालयातील प्राध्यापक व विशेष करून प्रा. फारुख खान यांना देतात.

त्यांचे मार्गदर्शनामुळे बारावी झाल्याबरोबरच प्रवेश परीक्षा दिली व एमबीबीएसला वसंतराव नाईक वैद्यकीय विद्यालय यवतमाळ येथे निवड झाली.सर्विस बॉंड पूर्ण झाल्याबरोबर स्पेशालिटी एमडी ( मेडिसिन ) करिता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम येथे निवड झाली.सेवाग्राम तेथे अतिदक्षता विभागात कोरोना काळात त्यांनी रुग्णांना भरपुर सेवा दिली.त्यात शहरातील अनेक कोविड रुग्णांचा समावेश आहे.

आपल्या तालुक्यातील गरीब रुग्णांना ते सदैव तत्परतेने आपल्या नावाअनुरूप शहर म्हणजे शहर – गाव यार म्हणजे मित्र संपूर्ण शहराचे मित्र याप्रमाणे मार्गदर्शन व मदत करतात.एमडी मध्ये गोल्ड मेडल मिळवीत यश प्राप्त करत,याच काळात PGDGM, CCMH हे कोर्स सुद्धा पूर्ण केले.सध्या त्यांची निवड सुपर स्पेशलिटी डीएम (कार्डीओ )करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटी नागपूर येथे झाल्याने शहरात सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सतत अभ्यास रुग्णसेवा, आई वडील, थोरल्यांचे आशीर्वाद व गुरूंचे मार्गदर्शन हेच यशाचे गुपित असल्याचे असे सांगत, डॉ. शहरयार यांनी भविष्यात गरिब व गरजवंत रुग्णांची अविरत सेवा करून देशाचे -समाजाचे ऋण फेडणे हे चे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार फिरोज अन्सारी यांनी केले.