शिवछत्र परिवाराच्या वतीने आज गेवराईत ईफ्तार पार्टीचे आयोजन

32

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.30एप्रिल):- मुस्लिम समाजाच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानिमित्त शिवछत्र परिवाराच्या वतीने गेवराई येथे रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजनकरण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

प्रसिद्ध पत्रकात ते पुढे म्हणाले की, शिवछत्र परिवाराकडून प्रतिवर्षी पवित्र रमजान निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे अयोजन केले जाते. कोविड संक्रमणाच्या कठीण काळात आपण मागील दोन वर्षे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करू शकलो नाही. यावर्षी मोठ्या उल्हासात पवित्र रमजान निमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन गेवराई शहरात रविवार दिनांक ०१ मे रोजी सायंकाळी जिल्हा परिषद कन्या प्रा.शाळा, गेवराई येथे करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुस्लिम समाज बांधवांना रमजान निम्मित शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.