सुभाष दळवी, यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी” ची “मानद डॉक्टरेट “(डी. लिट), पदवी

30

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.1मे): – मुंबई महानगर पालिका, घन कचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री.सुभाष दळवी, यांना “कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी” (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) कडून “पर्यावरण संरक्षणासाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापनात ” या विषयात नुकतीच ” मानद डॉक्टरेट “(डी. लिट), ही मानाची पदवी बहाल केली आहे. ही पदवी प्राप्त करणारे श्री.दळवी हे महानगरपालिकेतील पाहिले अधिकारी आहेत.

श्री. दळवी यांनी यापुर्वी मुंबई विद्यापीठ येथून बांधकाम व्यवस्थापन क्षेत्रातील मास्टर इन सिव्हिल इंजिनिअर ही पदवी प्राप्त केली आहे .श्री दळवी, हे भारत सरकारच्या “राष्ट्रीय युवा पुरस्कार” आणि युनायटेड नेशन्सच्या “डिकेड्स ऑफ सस्टेनेबल एनर्जी” तसेच “पर्यावरण रत्न” या सारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.दळवी यांनी 1997-98 मध्ये लोकसहभागातून तीन महिन्यांत अस्वच्छ धारावीचे “स्वच्छ परिसर” मध्ये रूपांतर करून आपले नेतृत्व सिद्ध केले.भारत सरकारने लोकसहभागातून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी “धारावी” चे परिवर्तन करण्याच्या श्री. दळवी यांच्या नेतृत्वावर “धारावी – एक नवी पहाट – NM – 380 ” ( Dharavi – a new beginning – NM-380) या नावाने एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली.

श्री दळवी, हे “संत गाडगे बाबा त्रिसूत्री योजना” (स्वच्छता, आरोग्य आणि स्वयंरोजगार) तसेच नाविन्यपूर्ण अशा “तीन चाकी – कचरा संकलन प्रणाली” यासारख्या विविध स्वच्छ मुंबई प्रकल्पांचे प्रणेते आहेत. श्री. दळवी यांनी , ” घनकचरा वर्गीकरण, ” कचरा वेचक चळवळीद्वारे “सुका कचरा संकलन” , वर्मी कल्चर तसेच बायो कल्चर स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम आणी सेंद्रीय शेती प्रकल्प , तसेच लोकसहभागातून विलेपार्ले (पूर्व) परिसरात “प्लास्टिक पिशवीचा मोह टाळा ” (प्लास्टिक कॅरी बॅगला नाही म्हणा) ही चळवळ आणि असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.श्री. दळवी यांच्या संकल्पनेतून “स्मार्ट वर्मी कंपोस्ट सिस्टीम आणि सेंद्रिय शेती प्रकल्प” हा ” निसर्गाचे निसर्गाला परत करा ” या संकल्पनेतील प्रकल्प कूपर हॉस्पिटल , विलेपार्ले ( वेस्ट ), मुंबई , एसएनडीटी जुहू कॅम्पस, राणी बाग प्राणी संग्राहालय , सरकारी वसाहत , वांद्रे (पूर्व) येथे यशस्वीपणे राविण्यात येत आहे.

श्री. दळवी हे “स्मार्ट बायो कंपोस्ट सिस्टीम” चे सुद्धा प्रणेते आहेत . हा प्रकल्प कुलाबा येथील भारतीय नौदलाच्या “नोफ्रा” भागात आणि जोगेश्वरी (पूर्व) मध्ये JVLR वर ग्रीनफिल्ड सोसायटी येथे यशस्वीपणे राविण्यात आला आहे.मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी कॅम्पसमध्ये “स्मार्ट वर्मी कंपोस्ट सिस्टीम आणि सेंद्रिय शेती प्रकल्प” चे सध्या काम सुरू आहे.”झोपडपट्टी स्वच्छता” राखण्यासाठी लोक वर्गणी आणि लोक सहभागातून “झोपडपट्टी दत्तक योजना “आणि” स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान” (SMPA) ची दळवी सरांची नाविन्यपूर्ण कल्पना.सदर योजना मुंबईतील 75 लाख लोकसख्येच्या झोपडट्टी परिसरात राबविली जाते. सदर उपक्रम राबिण्यासाठी वस्ती पातळीवरील सुमारे 750 स्थानिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या 9000 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत.निर्माल्य व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी “निर्माल्य कलश योजना” ही नाविन्यपूर्ण कल्पना देखील श्री. दळवी यांचीच आहे.

कूपर हॉस्पिटलमध्ये श्री दळवी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “स्मार्ट गांडूळ खत आणि सेंद्रिय शेती” या नाविन्यपूर्ण उपक्रमला प्रसिद्ध अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्याचं कौतुक केलं आहे.श्री दळवी यांनी “स्मार्ट होम कंपोस्ट सिस्टीम” देखील विकसित केली आणि स्वतःचे उदाहरण देऊन ते यशस्वीरित्या त्यांच्या घरी लागू केले आणि आता ते अनेक घरांमध्ये लागू केले गेले आहे.श्री. दळवी , यांनी “कोविड महामारीच्या” सुरवातीच्या काळात डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉय, हाऊस किपिंग स्टाफ, सफाई कामगार कार्यालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी इत्यादी आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी “कोविड योद्धा” म्हणून कठोर परिश्रम केलेत.श्री. दळवी यांनी त्यांना न घाबरता काम करण्याची प्रेरणा देण्यासाठी अनेक तणाव व्यवस्थापन सत्र घेतले आणि कोविड 19 पासून स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे तसेच महाविद्यालयाचे संरक्षण कसे करावे यासाठी मार्गदर्शन केले.

श्री. दळवी यांनी सर्व कोविड आणि नॉन कोविड रुग्णालय, बीएमसी कार्यालय आणि पोलीस ठाण्यांना भेट देऊन फ्रंटलाइन कामगार आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रेरित केले.तसेच एप्रिल 2019 पासून ते आजपर्यंत “कोविड योद्धा” म्हणून कठोर परिश्रम घेत आहेत. त्यांच्या कार्याचे विविध मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे व प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.श्री. दळवी यांनी आज पर्यंत सुमारे 50,000 तरुण, महिला, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकारी यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक “तणाव व्यवस्थापन आणि जीवन परिवर्तन” सत्र घेतली आहेत.

श्री. दळवी यांनी ओरिसा चक्रीवादळ ( 1999 ) , भुज भूकंप ( 2001), सांगली-कोल्हापूर पूर( 2020), महाड पूर आणि भूस्खलन ( 2021)अशा अनेक आपत्तींमध्ये यशस्वी बचाव आणि मदत पथकाचे नेतृत्व केले.नुकतेच राजभवनावर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मा.सुभाष दळवी यांच्या कार्याचे कौतुक व सन्मान करण्यात आला. आता श्री दळवी, SMPA CBOs, स्थानिक गट, वन विभाग, आरे अधिकारी आणि स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी यांच्यासोबत लोकसहभाग आणि समन्वयाने “बिबट्याचा हल्ला” रोखण्यासाठी “मिशन क्लीन आरे कॉलनी” साठी काम करत आहेत.यासाठी श्री दळवी, विविध आदिवासी पाड्यांना भेटी देऊन स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाबाबत प्रबोधन करत आहेत.श्री. दळवी हे खूप उत्साही आहेत आणि लोकसहभागातून घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात सुमारे 27 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याकडे आहे.