गडचिरोली शास. औ. प्र. संस्थेत ६मे रोजी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे भव्य आयोजन

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1मे):-जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कुठल्याही व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण / अनुत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील सर्व माजी उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे भव्य आयोजन गडचिरोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येत्या ६ मे रोजी दुपारी अकरा वाजता करण्यात आलेले आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या पे रोलवर घेण्यात येणार असून कंपनीच्या अंतर्गत शासकीय योजना अंतर्गत,निम व एनएपीएस अंतर्गत लाभ मिळणार आहे. एन्डूरंन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड वाळुज एम.आय.डी.सी. औरंगाबाद आणि पिअॅजीओ व्हेईकलस प्रा. लिमिटेड, बारामती जि. पुणे ह्या प्रसिद्ध कंपनीत रोजगार करण्याची संधी मिळणार आहे.

सदर भरती मेळाव्याचे नियोजन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी प्रशिक्षणार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन टीसिपिसी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहेृत . सुमारे ५०० जागांसाठी ही भरती होत असून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मेळाव्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थिती दर्शवावी. अधिक माहितीसाठी टीसीपीसी विभागाचे गटनिदेशक श्री. मधुपवार( 8087258852)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.