लातुर-बर्दापूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाची डॉ.प्रीतम मुंडेनी केली पाहणी

35

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.3मे):-मध्ये रस्त्यावरून राजकारण चांगलेच तापलं असून महाविकास आघाडी सरकारवर डॉ. प्रीतम मुंडे यांनी लातुर-बर्दापूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज ( 3 मे) आल्या असता टीका केली आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील ५२ पेक्षा अधिक जणांचा जीव रस्ते अपघातात गेला आहे. आणि याच मुद्यावर बीड जिल्ह्यच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्याशी माध्यमांनी बोलताना त्यांनी कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “काय ते एकदा भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, राष्ट्रीय महामार्ग असल्याकारणाने टीका माझ्यावरच होणार असेल कारण मी केंद्रातील खासदार आहे. तर मग मात्र राज्यातील सगळ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रासर्त्यांचे श्रेय माझेच असले पाहिजे. माझ्या जिल्ह्यामध्ये एखादा नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. तेव्हा त्यांच्या पक्षाचे आमदार जाऊन नारळ फोडतात तेव्हा त्यांना दोष दिला जात नाही,” असे म्हणत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचे नाव न घेता टीका केली.

प्रीतम मुंडे म्हटले, “क्रेडिट घ्यायला ते आणि दोष घ्यायला खासदार, ते कुठेतरी दुजाभाव आहे. हा दोष मला समजत नाही, त्यांच्या मंचावर कुठंतरी त्यांच्याच पक्षाचे लोक आहेत त्यांच्याच लोकांकडे पालकमंत्री पद आहे. दोन पदरी का होईना हे रस्ते आमच्या कारकिर्दीत झाले आहेत. ते लोक विसरले नाहीत.”