आला पावसाळा विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन संपन्न

  98

  ✒️बीड(अंगद दराडे, मो:-8668682620)

  बीड प्रतिनिधी(दि-29 जून):-मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण या साहित्य समुहा तर्फे आला पावसाळा या विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन
  28 जून रोजी सुनीता सुरेश महाबळ .बालेवाडी, पुणे यांच्या हस्ते अगदी थाटामाटात संपन्न झाले .
  यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत सुप्रसिद्ध साहित्यिकांनी समूहात ऑनलाईन उपस्थितीत दर्शवली .
  काव्य संग्रहाचे संपादक अंगद दराडे व काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब) (राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित) यांनी खूप मेहनत घेऊन हा ई- काव्य संग्रह तयार केला यातील सर्व कवीता अगदी आकर्षक,वाचनीय आहेत .
  काव्य संग्रह प्रकाशित होताच अनेक नामवंत साहित्यिकांनी त्यांच्या लेखी अभिप्राया चा समूहात जणु वर्षाव केला .या अंकामध्ये एकूण ३० रचना चा समावेश आहे त्यात लीलाधर दवंडे, उषा घोडेस्वार, प्रा.सुनंदा पाटील, श्रध्दा पाटील, राजेश लक्ष्मण वऱ्हाडे.इत्यादी अनेक साहित्यिकांच्या रचनाचा समावेश आहे

  प्रशासक समितीचे नंदकुमार शेंदरे सर , शालूताई कृपाले , विशाल पाटील वेरूळकर सर , यांनी ही या संग्रहास मोलाचे योगदान देऊन हा प्रकाशन सोहळा अगदी उत्साहात पार पाडला
  स्पर्धेसाठी ज्यांनी खुप मेहनती घेऊन सहकार्य केले ते ओमकार मानकामे सर यांचे ही संपादकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानन्यात आले