आष्टी पोलिसांनी पकडली दोन लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमालासह दारू देशी व विदेशी

31

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतिनिधी)

चामोर्शी(दि.14मे):-चंद्रपूर वरून आष्टी मार्गे आलापल्ली दारू जात असताना माहिती मिळताच त्याआधारे आष्टी पोलिसांनी मुद्देमालासह दोन लाख सहा हजार रुपयाची दारू पकडली,

सविस्तर वृत्त अशी आहे की चंद्रपूर येथील इसम ऑटो रिक्षा चालक आपल्या ॲटो मध्ये चक्क सीट च्या मागे देशी व विदेशी दारू भरून नेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळताच यांनी चेक पोस्ट नाक्यावर नाकाबंदी करून पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, मोरेश्वर करमे, ज्ञानेश्वर मस्के, कुंडलीक चौधरी ,मुनीश्वर रायसीडाम ,रत्नाकर खेकारे व वाहनचालक विनोद गौरकर यांनी चेक पोस्ट नाका येते आटोला थांबवून ऑटोची तपासणी केली असता सीट च्या मागे देशी विदेशी दारू आढळून आली.

त्यानंतर त्याला आष्टी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले त्यामध्ये देशी दारू साठ हजार रुपये व विदेशी दारू छप्पन हजार रुपयांची ऑटो मध्ये मिळाली त्यानंतर सदर ऑटो व आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशन येथे कार्यवाही करून कलम 65 (अ) ,83 मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी चे नाव सलमान हुसेन सय्यद राहणार चंद्रपूर 22 वर्ष देवचंद पुंडलिक जांभूळकर राहणार आलापल्ली वय 32 वर्ष असून सदर दोन्ही आरोपीला चामोर्शी न्यायालयात हजर केले असता सदर आरोपी ला एक दिवसाची पोलीस रिमांड मिळालेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात मोरेश्वर करर्मे करीत आहेत सदर घटना 11 -5- 2022 ला सायंकाळी ची घटना आहे