रामतीर्थ पोलिसांनी नरसीत तर कुंटुर पोलिसांनी राहेर येथे पकडली अवैध दारू

30

✒️प्रतिनिधी नायगाव(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.27मे):-रोज 11.35 वा. चे सुमारास, नर्सी बसस्थानका समोर बिलोली रोडवर तालुका नायगाव जि. नांदेड येथे, बिना परवाना बेकायदेशीर रित्या हातभट्टी गावठी 3500 रू किमतीची देशी दारू पकडली तर कुंटुर पोलिसांनी राहेर येथील युवराज धाब्यावर अवैधरित्या देशी दारू विक्री करीत असल्याचा सुगावा लागताच धाड टाकून पंधराशे साठ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त केली. तर कुंटुर पोलिसांनी राहेर येथील युवराज धाब्यावर अवैधरित्या देशी दारू विक्री करीत असल्याचा सुगावा लागताच धाड टाकून पंधराशे साठ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.

याबाबत आधी माहिती अशी की, नरसी बस स्थानक समोरील नरसी बिलोली रोडवर बेकायदेशीर विना परवाना गावठी दारू यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या हातभट्टी गावठी दारु एकुण किंमती 3500 /- रुपयाची मो.सा. क्र. एम. एच. 26 / सीए – 7341 किंमती अं. 40000 /- रुपयाची यावर बसुन चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेवून जात असताना ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोह / 1935 शेख मुक्तार हैदर, ने. पोस्टे रामतीर्थ यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे रामतीर्थ गुरनं 84 / 2022 कलम 65 (ई) म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोह / 1935 शेख मुक्तार, हे पुढिल तपास करीत आहेत.

तर कुंटूर पोलिसांनी दि 27.05.2022 रोजी रात्री 07.00 वा. चे सुमारास, मौजे राहेर येथील युवराज धाब्यसमोर ता. नायगाव जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या विदेशी व देशी दारु भिंगरी संत्रा एकुण किंमती 1560 /- रुपयाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोह / 1592 विश्वांभर दिगांबर निकम, ने. पोस्टे कुंटूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कुंटूर गुरनं 93 / 2022 कलम 65 (ई) म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 2642 शेख, हे करीत आहेत.