राजेंद्र कांबळे नायगावकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड

33

✒️नांदेड,विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)   

नांदेड(दि.9जून):-राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे यांची नायगाव येथील युवा कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे यांनी  दिनांक ६ जून २०२२ रोजी  झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत नियुक्ती करण्यात आली. नायगाव येथील भूमीपत्र सामाजिक कार्यकर्ते असलेले राजेंद्र कांबळे नायगावकर यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन समाजाला न्याय देण्याचं काम व केलेलं आहे,म्हणून आतापर्यँत केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्य कार्यकारिणी सदस्य आस्तिक कोरडे यांनी राजेंद्र कांबळे नायगावकर यांची नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करून यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुके व गावपातळीवर जिल्हा व केंदीय कार्यकारिणीच्या व राज्य कार्यकारिणीच्या परवानगीने मानवाधिकाराचे उल्लंघन ऑट्रोसिटी ,महिला ,बालकावर होणाऱ्या अत्याचार , समाजावर अन्याय प्रतिबंधक व पिढीतांना न्याय हक्क मिळवून देण्याच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्य कार्यकारिणी सदस्य आस्तिक कोरडे यांनी सांगितले असून यावेळी शिवानंद जोगदंड संदिप गोरे रमेशचंद्र हाराळे गजानन जोगदंड तुळशीराम वाघमारे संजय सोनटक्के माऊली पाडीरकर शंकर धडके नानासाहेब धोडके बीड जिल्हाध्यक्ष गणेश गवळी मराठवाडा युवा अध्यक्ष राजेश जाधव बीड जिल्हा युवा अध्यक्ष बबन जिल्हाध्यक्ष मुरली भाऊ ठोंबरे हिंगोली जिल्हा अध्यक्ष माणिक चव्हाण नरसी येथून केरबाजी गंगासागरे अनिल गंगासागर शंकर बरबडे उपस्थित होते राजेंद्र कांबळे नायगावकर यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या.