लोकनेता डॉ. बाबु जोगदंड यांच्या पाठीशी युवकांची फौज उभी करणार – विवेक कुचेकर

29

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.10जून):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाट नेते डॉ बाबु जोगदंड साहेब यांनी गोरगरिबांना, ऊसतोड मजुर,दिन दलित, शेतकरी, शोषित पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

अशा लोकनेत्याच्या पाठिशी गोरगरीब जनतेचा आशिर्वाद कायमच असतो वंचित गोरगरिबांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी जिवाचे रान करणारा लोकनेता म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता गोरगरीब सर्वसामान्य वंचित समुहाची सेवा हे धेय मनाशी बाळगून लोकनेता डॉ.बाबु जोगदंड यांनी आमदार संदीप(भैय्या) क्षीरसागर यांच्या माध्यमातून वाडी वस्तीवर विकासाची गंगा खेचुन आणली आहे आगामी काळात डॉ.बाबु जोगदंड साहेब यांच्या पाठीशी बालाघाटावरती युवकांची फौज उभी करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे बालाघाट युवक नेते विवेक कुचेकर यांनी सांगितले आहे