कुरुल परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस केळी, पपई बागा जमीनदोस्त..

28

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.11जून):-9 जून व 10 जून रोजी कुरुल परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे कुरुल परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यांचा सर्वाधिक फटका पपई ,केळी, डाळिंब, शेवगा, आदी फळबागांना बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे कुरुल परिसरात केळी, पपई च्या भागात जमीनदोस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणात फळबाग वाऱ्यामुळे पडले आहेत. आधीच कोरोनाच्या संकटामुळे कुठल्या पिकाला भाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असताना. बळीराजा वर मोठे संकट व मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हवालदिल झाला आहे.

आणि कुठल्याही पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता कुठेतरी योग्य भाव मिळत असताना हातात हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, कारण रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढलेले आहेत, कीटकनाशकाची औषधे च्या किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे झालेल्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.