वडसी विहीरगाव रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करा -रिना पाटील यांची मागणी

31

🔸उपविभागीय अभियंता यांना दिले निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.22जून):- तालुक्यातील वडसी वरुन विहीरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं- मोठे खड्डे पडले असून रहदारी करण्यासाठी नाहक त्रास होत असुन वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी, चारचाकी वाहने चालवताना अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले असून खड्डे दिसतं नाही त्यामुळे त्वरीत एकतर रस्ता बनवा नाही तर वडसी विहीरगाव रस्त्याची दुरुस्ती करा अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर यांना रिनाताई पाटील यांनी दिले आहे.

सदर रस्ता या परीसरातील गावांसाठी महत्त्वपूर्ण असुन दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व बफर झोन मध्ये जाण्यासाठी कोलारा गेट व बफर चे गोडमोहाळी बेलारा गेट,पडसगाव गेट, मदनापूर गेट,शिरखाळा गेटला जाण्यासाठी या रस्त्याने पर्यटक ये जा करीत असतात.

याच मार्गाने पडसगाव,विहीरगाव, मदनापूर,मासळ या परीसरातील अनेक गावांतील नागरिक नवरगाव व नेरीकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा व जवळचा असल्याने ये- जा करीत असतात. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.याच मार्गांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी श्रीक्षेत्र गोंदेडा येथे भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात.आता पावसाचे दिवस व लागलेले आहेत.या परीसरातील शेतकरी वर्ग याच रस्त्याने येणे-जाने करावे लागते.तसेच आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होतात.विद्यार्थ्याना याचं रस्त्याने येणे-जाणे करावे लागते.करीता त्वरीत रस्ता बनवा किंवा रस्त्यावर मुरुम तरी टाका अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर,मा.बटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांना वडसी ग्राम पंचायत सदस्या सौ रिनाताई पाटील यांनी दिले आहे.