बंड फसले तरी !

39

✒️ऍड अविनाश टी काले(अकलूज)मो:-9960178213

शिवसेना पक्षा ने स्वतः कडे मुख्यमंत्री असावे म्हणून भाजपा ची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस बरोबर आघाडी करून सत्ता स्थापित केली व मुख्यमंत्री पद स्वतः कडे घेऊन महा विकास आघाडी ची सत्ता अडिज वर्ष केली ,पक्ष प्रमुख या नात्याने स्वतः मुख्यमंत्री पदी असल्याने शिवसेना अंतर्गत गट बाजिवर व शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाच्या फळीतील नेत्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षे वर अंकुश ठेवता येईल असा जो अंदाज शिवसेना प्रमुख उध्दव जी ठाकरे साहेबांचा होता तो मात्र अनाठायी असल्याचे आजच्या बंडाने सिद्ध केले आहे.राजकारणाच्या प्रांगणात निष्ठा , निष्ठावंत या शब्दाचे अस्तित्व विरळ असते आणि प्रत्येकाला आपापल्या सोईचे व फायद्याचे हवे असते.भाजपा ही हातातील सत्ता गेल्यामुळे सुडाचे भावनेने ओतप्रोत भरलेली असल्याने महा विकास आघाडिवर पाहिल्या दिवसापासून कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होती व आजवर राहिलेली आहे.हे सरकार तिच्यातील आंतरविरोधने आपोआप पडेल असा जो त्यांचा कयास होता , तो ही चुकीचा असल्याचे त्यांना उमगले.

तो आंतर विरोध हा वैचारिक भिन्नतेचा होता , हिंदुत्व वादी विचारधारा व काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस ची विचारधारा वेगवेगळी असल्याने अधिक काळ या पक्षात जमणार नाही असा हा अंदाज होता , परंतु मोठा कालावधी लोटून ही सत्ता बदलाची चिन्हे दिसत नव्हती म्हणून भाजपने बाहेरून या सत्तेवर आघात करण्यासाठी सर्व यंत्रणा आणि नेते यांना कामाला लावले , त्यात राणे , खोत असे नेते होते तर पडकळकर सारख्यांना आमदार बनवून आघाडी विरोधातील विरोध हलता ठेवण्याचे काम सुरू ठेवले.राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मदतीने हिंदुत्वाचे राजकारण सुरू केले आणि हिंदुत्वाचे मुद्यावर हे वादळ येऊन पोहचले.दुसऱ्या बाजूने सरकार वर आघात करण्यासाठी सरकार मधील नेत्यांना केंद्रीय यंत्रणा चे वापराने दडपण्याचे प्रकार सुरू ठेवले.व्यक्तिगत महत्वकांक्षा असलेल्या एकनाथ शिंदे सारख्या ची मदत घेऊन अनेक माहिती गोळा करण्यात आली आणि त्या माहितीच्या आधारे , प्रतापराव सरनाईक सारख्या ना लक्ष बनवण्यात आले.

यातूनच प्रतापराव सरनाईक यांचे उध्दव जी ठाकरे साहेब यांना लिहिलेले पत्र समोर आले ज्यात विनाकारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची भाषा होती व भाजपा समवेत जुळते घेतले तर त्रास होणार नाही अशी हतबलता व्यक्त करणारी मानसिकता ही व्यक्त होत होती.खरे तर हा इंडिकेटर होता , परंतु याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही , यातूनच एकनाथ शिंदे यांचे . मदतीने शिवसेनेला आतून धक्का मारण्याची रणनीती आखण्यात आली व हे पलायन नाट्य आज आपल्या समोर आहे.पक्षांतर बंदी कायद्या नुसार किमान दोन तृतीयांश बहुमत बाजूला असल्याशिवाय स्वंतत्र गट काढता येत नाही व आजच्या वेळे. नुसार किमान शिवसेना चे ३८आमदार फुटणे आवश्यक आहे , अपक्ष आमदारांनी गणती पक्षीय आमदारांच्या गणतित् होत नाही , म्हणून एकनाथ शिंदे यांचे ताफ्यात फक्त २६आमदार असल्या ने त्यांना कायदेशीर रित्या अलग होता येत नाही , व पक्ष सांगेल त्या शिस्तीचे पालन त्यांना करावे लागेल.

म्हणूनच आम्ही शिवसेना सोडली नाही याचा उच्चार त्यांना करावा लागत आहे.हिंदुत्वाचे मुदय्या आधारे भाजप समवेत सत्ता स्थापन केली तर आणि तरच एकनाथ शिंदे यांना मानणारा गट आजच्या शिवसेना समवेत राहील असे वक्तव्य करणे म्हणजे थेट नेतृत्वाला दिलेले ते आव्हान आहे.अश्या गद्दार लोकांना समवेत ठेऊन शिवसेनेला वाटचाल करणे अवघड आहे ही बाब भावी राजकारणाच्या दृष्टीने फार योग्य नाही.भाजपा आणि शिवसेना यांचेतील हिंदुत्वाचा फरक अधिक ठळक करण्याची गरज आहे अन्यथा भाजपा ची “रखेल” म्हणून शिवसेनेला राजकीय दृष्ट्या वाटचाल करावी लागेल.

प्रबोधन कार ठाकरे यांनी सांगितलेले हिंदुत्व हे अब्राह्मणी हिंदुत्व आहे , बहुजन समाजाला धर्माची देवळे बनवून लुटणारे ब्राम्हण हेच बहुजनांचे वैरी आहेत ही वैचारिक मांडणी ब्राम्हण ~ब्राम्हणेतर चळवळीच्या दिशेनेच प्रवाहित होते.फडणवीस, कुलकर्णी, देशपांडे , भागवत, पुरंदरे , भिडे , , बडवे , आदी ब्राम्हणाच्या हित संबंधाचे , त्यांच्या फायद्याचे , त्यांच्या फायद्यासाठी बहुजन जाती चां वापर करून घेणारे आमचे हिंदुत्व नाही तर ते तेल्या तांबोळया चे हित रक्षण करणारे , त्यांची सत्ता स्थापित करणारे , त्यांचे हित पाहणारे आहे है ठणकावून सांगून एस सी , एस टी, ओबीसी अश्या सर्व हिंदू वर्गाला सामावून घेणारी शिवसेना याची पुनर्बांधणी करावीच लागेल ,उच्च वर्णीय सोबत ठेवले , आणि त्यांना कितीही मोठे केले तरी ते शेवटी ब्राम्हणी वर्चस्वाधिन होतात हे सत्य समोर आलेले आहे हेच बंड फसले तरी……महत्वाचे आहे, नाही तर घात नीच्छित आहेच आहे