छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांचे येवल्यात भूमिपूजन

31

🔹येवला मतदारसंघ पाणीदार बनविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.8जुलै):-येवला तालुका हा पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. पाण्याची प्रचंड टंचाई असलेल्या या येवला तालुक्याला पाणीदार बनविण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहे. सन २००४ नंतर सुरुवातीच्या काळात केवळ येवला तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून विविध पिण्याच्या पाण्याचे व सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले असून येवला मतदारसंघ पाणीदार बनविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला तालुक्यातील नांदूर येथे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त पुरस्कृत जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत येवला तालुक्यातील नांदूर नळपाणी पुरवठा योजनेचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार किशोर दराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुणमामा थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, प्रमोद सस्कर, प्रकाश वाघ, माजी नगरसेवक प्रवीण बनकर,दिपक लोणारी, प्रसाद पाटील, राजुसिंग परदेशी, डॉ. नंदकिशोर शिंदे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, अरुण गुजराथी, समीर समदडीया, संतोष काटे, आनंद शिंदे, सुनील पैठणकर, मराठी इंडियन आयडल फेम आम्रपाली पगारे, प्रकाश बागल, तहसीलदार प्रमोद हिले, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सुरवातीला येवला तालुक्यासाठी महत्वपूर्ण असलेला मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. सर्वात प्रथम सन २००८ साली येवला तालुक्यात ३८ गाव पाणी पुरवठा योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आज ही देशातील नावाजलेली महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून ५६ गावे तसेच १० संस्थाना पिण्याचे पाणी पुरविले जाते असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, येवला अडतीस गावे पाणी पुरवठा योजनेचे नुतनीकरण करण्यासाठी १० कोटींचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून विजेचा भार कमी होणार आहे. राजापूर सह ४१ गावांकरिता पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून यासाठी १८८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लासलगाव विंचूरसह सोळा गावे पाणी पुरवठा योजना नुतनीकरण व सौर उर्जा प्रकल्पासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी ७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत असून येवला तालुक्यात २५ योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. या योजनेमध्ये नवीन उद्भव विहीर, पाण्याची टाकी, गावांतर्गत वितरण व्यवस्था,नळजोडणी या कामांचा समावेश आहे. यामध्ये मागील महिन्यात पारेगाव, उंदीरवाडी व कोटमगाव विठ्ठलाचे या योजनांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच नांदूर येवला रस्ता मंजूर करण्यात आला असून पुरवणी मागण्या अंर्तगत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, रेल्वे पासिंगच्या बोगद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचण होत आहे. यासाठी आपण रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असून मंत्री डॉ. भारती पवार यांनी विशेष पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, आमदार किशोर दराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

*येवला तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली कामे*

सत्यगांव नळपाणी पुरवठा योजना ३७.६२ लक्ष, बाळापुर नळपाणी पुरवठा योजना ४९.८६ लक्ष, रायते ग्रा.पं चिंचोडी नळपाणी पुरवठा योजना ७६.९२ लक्ष, मोठामळा ग्रा.पं सावरगांव नळपाणी पुरवठा योजना ४५.५५ लक्ष, लोखंडेवस्ती देवरगांव ग्रा.पं नळपाणी पुरवठा योजना ४६.६६ लक्ष, गोपाळवाडी ग्रा.पं सावरगांव नळपाणी पुरवठा योजना ३८.६५ लक्ष, वळदगांव ग्रा.पं.शिरसगांव लौकी नळपाणी पुरवठा योजना ५०.३२ लक्ष, लौकी शिरसगांव ग्रा.पं.शिरसगांव लौकीनळपाणी पुरवठा योजना ६६.२८ लक्ष, धनकवाडी ग्रा.पं गुजरखेडे नळपाणी पुरवठा योजना २९.९४ लक्ष, गुजरखेडे नळपाणी पुरवठा योजना ३५.६९ लक्ष,कानडी नळपाणी पुरवठा योजना ८७.७६ लक्ष,सावरखेडे ग्रा.पं अनकुटे नळपाणी पुरवठा योजना १९.०१ लक्ष, देवळाणे नळपाणी पुरवठा योजना १२७.२७ लक्ष, पिपळगांव जलाल नळपाणी पुरवठा योजना ४३.६२ लक्ष, अंदरसूल नळपाणी पुरवठा योजना ९८.८३ लक्ष, देशमाने खु. नळपाणी पुरवठा योजना ७७.६९ लक्ष, निमगांवमढ नळपाणी पुरवठा योजना ५८.४६ लक्ष, सायगांव नळपाणी पुरवठा योजना ३२.९८ लक्ष, अडगांव रेपाळ नळपाणी पुरवठा योजना ५३.११ लक्ष, आंबेगांव नळपाणी पुरवठा योजना ८८.१७ लक्ष, नगरसूल नळपाणी पुरवठा योजना २२६.५२ लक्ष या योजनांना मंजुरी मिळाली आहे.