जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमास धान्य व खाऊ वाटप

✒️मनोहर गोरगल्ले(खेड तालुका प्रतिनिधी)

खेड(दि.17 जुलै):- लोकनेते दौलत नाना शितोळे संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेगाव तालुका बालगृह अनाथ निराधार मुलांची संगोपन केंद्र पळसटिका (घोडेगाव) या ठिकाणी शितोळे यांना मुलांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व अनाथ मुलांना केळीचे तसेच धान्याचे वाटप करण्यात आले. लोणी गावचे माजी सरपंच,जय मल्हार क्रांती संघटना आंबेगाव तालुका अध्यक्ष सावळेराम आबाजी नाईक यांच्या वतीने मुलांना धान्य व खाऊ वाटप करण्यात आले.

या प्रसंगी आंबेगाव तालुका संघटना कार्यकर्ते राजेद्र सोनू मंडलीक, सचिव संजय शिवाजी गफले ,तसेच पुणे जिल्हा उत्तर विभाग उपाध्यक्ष रामदास छबु शिंदे व पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष बाळासाहेब ज्ञानेश्वर शितकल तसेच नंदकुमार मनोहर चव्हाण, उत्तर पुणे जिल्हा निरीक्षक बाळासाहेब शिरतर, सौ.सरीताताई चव्हाण पुणे जिल्हा उपाध्यक्षा व इतर मान्यवर हजर होते.

त्याच प्रमाणे मंगरूळ येथील स्वप्नवेध अनाथालय येथे लहान मुलांना खाऊवाटप व कपडे वाटप केले . तसेच दर महिन्याला 1 तेलाचा डबा देण्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED