पूरग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई दया – महेश गिरङकर

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.21जुलै):- मागील पंधरा दिवसापासून संतत पावसामुळे अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतात तसेच नागरिकाच्या घरात घुसले.यात घराची पङझङ झाली. चंद्रपूर जिल्हयात नागरिकांच्या घरांचे शेतींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उमा नदी वैनगंगा नदी किनारी व इतरही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्या परिस्थितीत झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी ,अशी मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच सदस्य व सामाजिक कार्यकर्ता महेश गिरङकर प्रशासनाच्या माध्यमातून सरकारकङे केली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्हयातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे .त्यांमुळे जनजीवन पूर्णपणे विसकळित झाले आहे.अजूनही पाऊसाची रिमझिम सुरुच असल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊ शकते.अश्या परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदततिचा हात देण्याची आवशयकता आहे.प्रशासनाने पूर ग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना शेतातिल पिकांचे नुकसान पाहता त्वरीत पंचनामे सर्व गोष्टीबाबत तातडीने कारवाई करून नागरिकांना मदत देण्यात यावी.अशी मागणी महेश गिरङकर यानी केली आहे.