प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट देऊन वाढदिवस साजरा

33

🔹पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी जपली माणुसकी

✒️पिंपरी चिंचवड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पिंपरी चिंचवड(दि.21जुलै):- व्यस्त जीवनशैलीतून थोडासा वेळ काढून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्धांच्या सहवासात काही वेळ घालवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवडच्या महिला उपाध्यक्षा उषा लोखंडे या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील महिलांना जीवनावश्यक वस्तू व फळं भेट देवून साजरा करण्यात आला.सदर वाढदिवस बिजलीनगर (चिंचवड) येथील मातृसेवा संस्थेला भेट देऊन साजरा करण्यात आला.

यावेळी तेथील वृद्ध स्त्रियांशी संवाद साधून त्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जिवनावश्यक भेटवस्तू, बिस्कीट व फळं देऊन साजरा करण्यात आला.
यावेळी आबाल वृद्धांशी संपर्क साधून त्यांच्याशी हितगुज करण्यात आले. काही महीलांनी लव यु म्हणत स्वागत केले तर काहींनी गाणे गाऊन पत्रकारांना चांगला प्रतिसाद दिला. काहींना स्मृतीभ्रंष झाल्याचे आढळले, यावेळी जिवनातील शेवटच्या टप्प्यांच्या कंगोर्याचे वास्तव दर्शनही येथे झाले. अशा वेळी अनेकांचे डोळे पाणावले.मातृसेवा संस्थेच्या संचालिका संस्कृती यांनी यावेळी संस्थेबद्दल माहीती दिली. शिवाय संस्थेला आर्थिक मदतीची गरज असल्याने मदतीची मागणी केली.

मुळ संस्थापक गोडसे व त्यांचे संपूर्ण कुटुंब संस्थेत सेवाभावी वृत्तीने सहभागी झाले आहेत याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजन नायर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संतोष रणसिंग, महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, शहर उपाध्यक्षा उषा लोखंडे, सह सचिव निर्मला जोगदंड, सचिव संजीवनी कदम, कोषाध्यक्ष राजेश शिंदे, सदस्य शोभा क्षीरसागर, सदस्य हुसेन खान, सदस्य आली ईराणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.