शहर काँग्रेस कमिटीच्या मागणी नुसार चिमुर नगर परिषदेला मिळाले कायमस्वरूप मुख्यधिकरी

35

🔸शहर काँग्रेसच्या वतीने पुष्गुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.21जुलै):-शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनेक दिवसा पासुन मागणी होती की चिमुर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकरी देण्यात यावे, संदर्भात मागील दिड वर्षापासून अनेकदा उपविभागीय अधिकारी, चिमुर यांचे मार्फत निवेदने देऊन अनेक वेळा शासनाला मागणी केली परंतु शासनाकडे काही करणास्थव राज्यात मुख्यधिकारी नसल्यामुळे सध्या दिड , दोन वर्ष पासुन प्रभारी मुख्यधीकारी म्हणून काळण्यात आले असुन आता शासनाने चिमुर नगर परिषदेला अनुभवी मुख्याधिकरी म्हणुन सिंदेवाही नगर पंचायला गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असलेल्या मुख्यधिकारी सुप्रियाताई राठोड यांची चिमुर नगर परिषदेला कायमस्वरूपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता चिमुर ची जनतेची कामे लवकरात लवकर पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.मुखधिकारी मैडम यंच्या चिमुर नगर परिषदेच्या मुख्यधीकारीपदी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल शहर काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या उपस्थित पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन चिमुर नगर परिषद अंतर्गत विविध प्रकारच्या समस्या ,उदा. घरकुल योजना , शहरात स्वच्छता बद्दल, पुर पीडितबद्दल जनतेला मदत असे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख , तालुका महासचिव विलास मोहीनकर, जिल्हा महासचिव गौतम पाटील, विधानसभा उपाधयक्ष नागेंद्र चट्टे , राजु पाटील, नईम शेख इत्यादी उपस्थित होते.