उमरखेड, महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट मदत दयावी. -आमदार नामदेव ससाने

27

🔹अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहीरीचे तात्काळ पंचनामे करा     

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 22जुलै):-मागील आठवडयामध्ये उमरखेड आणि महागांव तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक निवेचनेत सापडला आहे.तेव्हा शेतकऱ्यांना सरसगट मदत दयावी अशी मागणी आमदार नामदेव ससाने यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत पुर परिस्थितीचा आढावा घेतांना शुक्रवार दिनांक 22 रोजी केली आहे.

उमरखेड आणि महागांव तालुक्यात सततधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या असलेल्या व पेरणी झालेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नदी, नाल्याकाठावरील शेती खरडून गेली असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे काही ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याचे संकट सुध्दा ओढवले आहे.त्यामूळे उमरखेड व महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट मदत जाहीर करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पुर परिस्थितीच्या आढावा बेठकीत केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , तहसिलदार आनंद देऊळगांवकर उपस्थित होते.सततच्या पावसामुळे पिकासोबतच विहीरी खचून विहीरीचे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तेव्हा तात्काळ खचलेल्या शेतकऱ्यांच्या विहीरीचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार ससाने यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत.