जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचा परतीचा पंढरपूर ते देहू आषाढी वारी पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र देहुनगरीत उत्साहा स्वागत

96

✒️राजगुरुनगर प्रतिनिधी(मा.मनोहर गोरगल्ले)

राजगुरुनगर(दि.२४जुलै):- जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा आषाढी वारी परतीचा पालखी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात श्री क्षेत्र देहू या ठिकाणी येऊन सोहळ्याची सांगता झाला. आज सकाळी जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा सकाळी ठीक बारा वाजता भक्तीशक्ती चिंचोली या ठिकाणी पादुका चौकात आला असता. त्या ठिकाणी सर्व विणेकरी यांची त्यांच्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांनी दर्शन घेतले व त्या ठिकाणी आरती होऊन पालखी सोहळा देहू नगरीकडे मार्गस्थ झाला.

पालखी सोहळ्यात सर्व वारकरी विठुराया जय घोष करीत उत्साहात व पावसाच्या वातावरणात तल्लीन होऊन नाचत होते. तसेच देहू नगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री संत तुकोबाराय यांच्या पादुका मेन मंदिरामध्ये ठेवण्यात आल्या. नंतर पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दिंडीने इंद्रायणी तीरावर जाऊन आरती करून सोहळ्याची सांगता केली. —