ग्रामीण विकास विद्यालयात सायकल वाटप

64

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.30जुलै):-चंद्रपूर जिल्हा ग्रामीण शेतमजूर व अल्पभुधारक सहाय्यक संस्था सिंदेवाही द्वारा संचालित ग्रामीण विकास विद्यालय मेटेपार येथील विद्यार्थिनीना शाळेत येणे- जाणे करणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने मानव विकास कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याधापक आनंद शंभरकर, सरपंच रामभाऊ सावसाकडे, शिक्षक धनराज मुंगले, भगीरथ नाकाडे, प्रयोगशाळा परिचर सुरेखा सदन, शिपाई सुरेश ढोले, किरण नागरे आदीसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी २२ विद्यार्थिनीना सायकल वाटप करण्यात आले.