उमरखेड रिपब्लिकन युवा सेनेच्या प्रयत्नाला आले यश

28

🔹जिल्हाधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 9 अगस्ट) रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने 25 जुलै 2022 रोजी मौ. टाकळी (रा.) रस्त्याचे खडीकरण व डांबरीकणाच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी साहेब उमरखेड यांना 15 दिवसाचा अवधी देऊन 10 ऑगस्ट 2022 रोजी आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता.

त्या संदर्भात उमरखेड रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर व उमरखेड शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर यांनी 4 ऑगस्ट रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हापरिषद यवतमाळ यांची प्रत्येक्ष भेट घेऊन मौ. टाकळी (रा.) ता.उमरखेड रस्त्याचे खडीकरण व डांबरीकणाचे सात महिन्यापासून रखडलेले काम तात्काळ पूर्ण करून सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही भूमिका घेऊन त्यासंदर्भात 10 अगस्ट 2022 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे होत असलेल्या आमरण उपोषणा दरम्यान टाकळी येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास जिल्हाअधिकारी कार्यालय यवतमाळ येथे अमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते.

त्या संदर्भात मा. जिल्हाअधिकारी साहेब यांनी विशेष दखल घेऊन कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक 2 जिल्हा परिषद यवतमाळ यांना

“सबब मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर प्रकरणी प्रथम प्राधान्य देऊन अर्जामधील उपस्थित मुद्द्यावर शासन प्रचलित नियमानुसार सखोल व सविस्तर चौकशी करून तक्रार/निवेदन तात्काळ निकाली काढणे व अर्जदारास उपोषणाबाबत परावृत्त करावे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अंतिम अहवाल परस्पर अर्जदारास आणि या कार्यालयास सादर करावा”..

असा आदेश आज 8 अगस्ट 2022 रोजी पारीत करण्यात आला असुन सदर प्रकरणी चौकशी होऊन अहवाल प्राप्त होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता व मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी अर्जदारास उपोषणाविषयी दिलेले निर्देश प्रमाण मानून 10 अगस्ट 2022 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे होत असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असुन मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर प्रकरणी विशेष दखल घेऊन तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याबद्दल रिपब्लिकन युवासेना व टाकळी (रा.) येथील ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.