प्राथमिक जिल्हा परिषद कुरुल शाळेमध्ये एक हजार विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप: पं.स.सदस्य जालिंदर भाऊ लांडे

97

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.14ऑगस्ट):-दि.१३ आॅगस्ट रोजी प्रथम सावित्रीबाई फुले व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मोहोळ चे आमदार यशवंत तात्या माने मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेंडसे पाटील गटविकास अधिकारी मोहोळ आनंद मिरगीणे गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी सरपंच चंद्रकला पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कुरुल मध्ये कुरुल गावचे माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे हे १९८७ पासुन खंड न पडता आज तगायत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशच वाटप ३५ वर्ष करतात. कुरुल गावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावं व त्यातून गावातील विद्यार्थी शिकून मोठे व्हावे व कूरुल गावचे नाव प्रसिद्ध व्हावे ही एकच मनोकामना ठेवून दरवर्षी गावातील १३ अंगणवाड्या व ९ जिल्हा परिषद शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप निस्वार्थपणे करतात.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांनी भूषवलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास लाभलेले प्रमुख मान्यवर मोहोळ चे आमदार यशवंत तात्या माने मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेंडसे , गटविकास अधिकारी आनंद मिरगिणे , जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी यांचा सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक जालिंदर भाऊ लांडे यांचा सत्कार जिल्हा परिषद शाळा कुरुल शिक्षक ,शिक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला. ज्यांनी अविरतपणे देश सेवा केली अशा सेवानिवृत्त मेजर कुरुल व कातेवाडी गावातील मेजर राजाराम ननवरे मेजर महादेव काकडे, मेजर कालिदास पाटील, मेजर संतोष जाधव, मेजर बाळासाहेब माळी, मेजर लिंगेश्वर निकम, मेजर तानाजी क्षीरसागर, मेजर चांगदेव मस्के, मेजर श्रीमंत पवार ,मा.पोलीस जिल्हा अधीक्षक शशिकांत माने शाल श्रीपाळ देऊन सन्मान करण्यात आला.

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास घोडके, कुरुल गावचे सरपंच सौ चंद्रकला माणिक पाटील, ग्रामसेवक घाटे मॅडम, ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग आबा जाधव सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.

चौकट
अखंड पणे ३४ वर्ष अविरतपणे लांडे भाऊंचा शालेय साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रमात मी १५वर्ष सहभागी होतोय.ज्यांनी जीवनामध्ये कष्ट, दारिद्र्य आणि वैभव बघितलं व कष्ट,दारिद्र्य बघुन वैभव बघतात ती फार थोडी माणसं असतात.: मा.आ.राजन पाटील कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.आपल्या सर्वाच्या आभिमानाची गोष्ट देशाची सेवा करुन सेवानिवृत्ती मेजरचा सन्मान व सत्कार करण्यात आले.त्याबद्दल लांडे भाऊंच आभार: आमदार यशवंत माने

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिताराम लांडे, बाळासाहेब लांडे, गहिनीनाथ जाधव, सुभाष माळी, लक्ष्मण भालेराव, अमोल माळी,खराडे भाऊसाहेब, तंटामुक्त अध्यक्ष छत्रपती जाधव, विष्णुपंत जाधव, सुरेश बापू जाधव ग्रामपंचायत सदस्या सौ अंजली गायकवाड,रोहिणी तगवाले,

केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे, मुख्याध्यापक मुचंडे , व कुरुल भागातील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, शिक्षिका , पत्रकार बंधु सुहास घोडके, सुभाष शिंदे, नानासाहेब ननवरे , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले तर आभार कांबळे मधुकर यांनी केले. आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.