सवंगडी बॅच तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

56

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18ऑगस्ट):-शहरातील सरस्वती विद्यालयात 1984 ला इयत्ता दहावीला शिक्षण घेतलेल्या सवंगडी बॅच तर्फे बँकेत स्थिर निधी ठेवून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून याच विद्यालयातुन गुनानुक्रमे सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम 2100 रुपये, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते. मार्च 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी राधिका प्रशांत जोशी या विद्यार्थिनीने हा मान पटकावला. तसेच विवेक घण यांची आई श्रीमती मंगलाबाई चिंतामणराव घण यांच्या स्मरणार्थ 2100 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह हा दुसरा पुरस्कार देखील या विद्यार्थिनीस देण्यात आले आला.

या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष नळदकर, सचिव दीपक तापडिया यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पछाडे तर आभार प्रदर्शन गोपाळ मंत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मु.अ.लक्ष्मण मादरपल्ले, उपमु. छाया घोळवे, सवंगडी कट्टा चे प्रमुख रमेश औसेकर, राजू गळाकाटू, दशरथ सूर्यवंशी, नितीन चौधरी, विलास मंगरूळकर, विनायक दीडशेरे, सुरेंद्र नळदकर, बालाजी टोले, अण्णा जंगले, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब निरस, सुरेश नांदुरकर, उमा ब्याळे,रेणू घण,अनंत काळे आदींनी प्रयत्न केले.