दिव्यांगाचे स्वतंत्र्य मंत्रालय स्थापण करण्यासाठी प्रहार चे.जिल्हाधिकारी यांना निवेदन

31

✒️प्रदिप रघुते(प्रतिनिधी अमरावती)मो:-9049587193

अमरावती(दि.21ऑगस्ट):-देशाला स्वातंत्र्य होउन 75वर्ष पुर्ण झाली आहेत.परंतु दिव्यांगाच्या मागण्या आहे तशाच आहेत.दिव्यांग्य व्यक्ती हा समाजातील अत्यंत दुर्बल व दुर्लक्षित घटक आहे..ज्यांच्या घरांमध्ये दिव्यांग आहे .आणि ज्यांना दिव्यांग बद्दल मायेचा सागर आहे ते म्हणजे प्रहार सघंटणा..हि जाणिव लक्षात घेता राज्यात दिव्यागाची संख्या जवळपास 50 ते 60 लाख पेक्षा जास्त असुन आजही त्यांच्या समस्या प्रलंबित आहे स्वातंत्र्या ला 75वर्ष पुर्ण होऊन सुद्धा कोणतेही सरकार दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. याकरीता महाराष्ट्रा मध्ये दिव्यागाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापण करण्यात यावे व अन्य मागण्या करीता महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये दिव्यांगाच्या सह्यांची मोहीम दि.17/8/2022ते19/8/2022 ला घेण्यात आली.

त्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांच्या मागणी नुसार अमरावती जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय लवकरात लवकर स्थापण करण्यात यावे..यासाठी मोठ्या संख्येने दिव्यांगाच्या उपस्थित. निवेदन देण्यात आले..त्यावेळी.चंदु खेडकर.वसु महाराज.शाम राजपुत.कमलेश गुप्ता.हेमंत लिखार.नरेद्र चंडकापुरे.ईश्माईल शाहा.विजय बाबर.गजानन फिरके.अजय तायडे.नादगाव खंडेश्वर वरुन.प्रदिप रघुते.. सिद्धार्थ किर्दक.अशोक बनोटे.रामेश्वर राठोड.सचिन खंडागळे.अतुल शेवंडे.राजु ईटणकर.भारती उईके.चेतन गाडेकर.सह कार्यकर्ते हजर होते