लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांची मोठी कारवाई

33

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.1सप्टेंबर):-भरदिवसा लूटमार करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केलाय. दुचाकीवर जाणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्याला, दुचाकी आडवी लावून लुटल्याचा प्रकार गेवराई परिसरात घडला होता. यातील आरोपी असणाऱ्या 3 जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलंय. याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, 26 ऑगस्ट रोजी आयडीएफसी बँकेचे कर्मचारी सुदर्शन शिवाजी आघाव, हे पाचेगाव येथून महिला बचतगटांना दिलेल्या कर्जाचे हफ्ते वसुली करुन गेवराईकडे जात होते. या दरम्यान सर्व्हिस रोडवर असताना पाठीमागून एक प्लसर गाडीवर दोघांनी चाकुचा धाक दाखवून सुदर्शन यांच्या जवळील, 95 हजार 610 रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले.

याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात, बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, आनंद सुंदर ससाणे रा पंचशील नगर बीड, या मुख्य आरोपीसह त्याचे साथीदार असणाऱ्या, आकाश प्रकाश धुताडमल रा. टाकळगाव ता. गेवराई, आकिल इस्माईल शेख रा. आहेर वाहेगाव ता. गेवराई या तिघांना जेरबंद केलंय.

दरम्यान या टोळीला पकडल्याने बीड जिल्ह्यातील मोठं मोठे लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.