चिमूर(दि.5जुलै): चिमूर तालुक्यात एक कोरोना बाधित आढळून आल्यामुळे चिमूर शहर व परिसर दि.6जुलै ते 8 जुलै 2020 पर्यंत कडकडीत बंद राहणार आहे, मेडिकल व दवाखाने सुरू राहतील. या व्यतिरिक्त अन्य दुकाने बंद राहणार असून नागरिकांनी अत्यन्त महत्त्वाचे कामाशिवाय घराबाहेर पडू नये,असे आवाहन चिमूर नगर परिषद ने केले आहे. नियम व कायद्याचे पालन न केल्यास कायद्याच्या विविध कलमाद्वारे कठोर कारवाई करण्यात येईल, असे सूचित केले आहे.