घुग्घुस नगरपरिषदेने अंगणवाडी परिसरातील साफसफाई करण्यात यावी…उषाताई आगदारी

70

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.१४ सप्टेंबर):- २०२२ बुधवार रोजी घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले, घुग्घुस गावात बरेच वार्डातील अंगणवाडी परिसरात कचरा-काडी ,घाणीचे वातावरण प्रदूषित होत आहे,असी माहिती नागरिकांनी यंग चांदा ब्रिगेड आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात घुग्घुस येथे निवेदन देण्यात आले. असा संदेश बहुजन महिला आघाडी शहराध्यक्षा व यंग चांदा ब्रिगेड नेत्या उषाताई आगदारी यांना मिळताच त्यांनी नगरपरिषद कार्यालय घुग्घुस ला तत्काळ निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी परिसरात खळबळजनक कचरा-काडी, घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, लवकरात, लवकर नगरपरिषदेने कर्मचारी कामगार लावुन स्वच्छ करावे,अन्यता अशा घाणीमुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार तर यांचे जबाबदार नगरपरिषद राहील.यावेळी बहुजन महिला शहरध्यक्षा उषाताई आगदारी, यंग चांदा ब्रिगेडचे विलास वनकर, कामिनीताई देशकर, वंदनाताई निखाडे, भूदेवी अटेला, भारती सौदारी व इतर सदस्य उपस्थित होते.