21 तारखेला जुनी पेन्शन मागणीसाठी बीडमध्ये सरकारी कर्मचारी काढणार मोटरसायकल रॅली

15

🔹मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आवाहन

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.20सप्टेंबर):-जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व सर्व संघटना समन्वय समिती यांच्या माध्यमातून बीड येथे दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता सिध्दी विनायक कॉम्प्लेक्स माळी वेस छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे. याबाबत सर्व संघटना समन्वयक यांच्या समन्वय समितीची बैठक झाली. जुनी पेन्शन मोटरसायकल रॅली मध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन सहभागी होणार असून सर्व संवर्गच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येत मोटासायकल रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विष्णू आडे यांनी केले.

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी राज्यभरातील कर्मचारी गेली अनेक वर्ष सातत्याने करत आहेत.शेयर मार्केट आधारित एनपीएस योजनेच्या हाती कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय आहे. राज्यासह देशभरात यासाठी कर्मचारी, शिक्षक, अधिकारी एकत्रित येत सातत्याने आंदोलन करत आहेत. यापूर्वी याबाबत काही नेते केंद्राकडे बोट दाखवत. परंतु राजस्थान, झारखंड, छत्तीसगड या राज्यानी जुनी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत निर्णय घेवून अमलबजावनी केली. राजस्थान व झारखंड ही राज्ये तेथील कर्मचारी यांना जुनी योजना लागू करत असतील…तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू व्हायलाच हवी.

आज अनेकजन नोकरी मधून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना मिळणारे NPS द्वारे मिळणारे निवृत्ती वेतन हे अत्यंत तोकडे आहे. सेवानिवृत्ती नंतर किमान गरजा पूर्ण करणे सरकारी कर्मचारी यांना कठीण जाणार आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी होणाऱ्या जुनी पेन्शन मोटासायकल रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा समन्वय समिती ने केले आहे.

– महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा बीड