संविधान सन्मान यात्रेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

31

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.23सप्टेंबर):-नागपूरातील विविध संघटना चे वतीने दिनांक 22 सप्टेंबर रोजी दिक्षाभूमी येथून संविधान सन्मान यात्रा सकाळी काढण्यात आली. संविधान जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद, भारतीय समाजवाद जिंदाबाद, भारतीय धर्मनिरपेक्षता जिंदाबाद, भारतीय गणराज्य जिंदाबादच्या घोषणा फलक,विविध रंगाचे झेंडे, बनर, बिल्ले,रंगीत रीबीन लाऊन स्त्रि पुरुष, युवक युवती, श्रमिक, बुद्धीजीवी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

झमकोली, सीरसी, वेलतूर, फेगड, कटारा, नवेगाव, हिगनघाट, नेहरु नगर ,मानेवाडा, पांच्यांशी प्लॉट व नागपूरातील विविध वसाहतीतील नागरिकांनी सहभाग घेतला. दिक्षाभूमी, काचीपूरा, लोकमत चौक, झाशी चौक, व्हेरायटी चौक, संविधान चौकात यात्रा पोहचली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या नंतर लेझीम गीत, क्रांती गीत झालेत. संविधान प्रास्ताविका वाचन करण्यात आली.

प्रा देविदास घोडेस्वार, त्रिलोक हजारे, गौतम काबंळे, वदंना महात्मे, रुबीना पटेल, राहुल परुळकर ,दिनानाथ वाघमारे, सबीया खान ,संमीक्षा गणवीर, पुंडलीक तीजारे, लक्षमन बालपांडे, ईश्वर सातपुडके ,एकनाथ गजभिये, माया ढाकणे, पींकी रोडगे, किसनाबाई भानारकर ,कल्पना जोगे , अनंत अमदाबदकर , प्रकाश तोवर , ज्योती नीचळ , सुजाता भोंगाडे यांची भाषणे झालीत .विलास भोंगाडे यांनी संचालन केले .

कुमुद कांबळे, निलीमा घाटोळे,सरीता जुनघारे, रोषणी गंभीर, सोनाली जींदे,जासंवंदा खोंबागडे, रेखा गणवीर, सुजाता येवले, वनीता लोखंडे ,अश्विनी सोमकुवर, वैशाली शहाकार ,शिला बोरकर, सविता रामटेके, उज्वला नारनवरे, मनिषा शहारे, मनिषा मुनघाटे, अलका मडावी, करुणा करहाडे,अस्वीनी भारद्वाज असीत ढवळे यांनी विषेश परीश्रम घेतले . या कार्यक्रमाला सातशे ते आठशे लोक सहभागी झाले होते.