राम मेघे इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे ५३वा रासेयो स्थापना दिन

32

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.24सप्टेंबर): -प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५३ व्या स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयातील रासेयो विद्यार्थ्यांनी अतिथी व्याख्यान, पोस्टर प्रदर्शिनी आणि पथनाट्यचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रयास संकूर संस्थेचे संस्थापक डॉ अविनाश सावजी यांची उपस्थिती लाभली तसेच संगाबाअवि विद्यार्थी विकासचे संचालक डॉ राजीव बोरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उपप्राचार्य प्रा. पी व्ही खांडवे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख यांची उपस्थिती लाभली..

कार्यक्रमाप्रसंगी रासेयो च्या ५३व्य स्थापना दिवसाचे चित्य साधून रासेयोचे कार्य, विविध कार्यक्रमांचे आयोजन व त्याचे महत्व महाविद्यालयाच्या रासेयो सवयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे पोस्टर, कविता आणि पावरप्रेझेंटेशन देत उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रयास संकूर, अमरावती या संस्थेचे संस्थापक डॉ अविनाश सावजी यांनी उपस्थित विषयार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास आणि एक माणूस कसा असावा याचे जिवंत उदाहरण विद्यार्थ्यांना सांगितले तसेच संगाबाअवि विद्यार्थी विकास चे संचालक डॉ राजीव बोरकर यांनी रासेयो बद्दल विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला आणि विद्यार्थी उपयोगी विद्यापीठाच्या विविध योजनांबाबत माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह जागृत केला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात श्री वल्लभ चारीटेबल ट्रस्ट वलगाव द्वारे आयोजित रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील रासेयो विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्कृष्ठ सहकार्य बद्दल दिलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण उपस्थित पहुण्यांद्वारे करण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान, यांनी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. गायत्री बहिरे, प्रा. शुभम कदम, प्रा. अतुल डहाणे, प्रा. आशुतोष उगवेकर, मुख्य मार्गर्दर्शक प्रा कौशिक जोशी, सहकारी निशांत केने, जगदीश कापडे व रासेयो स्वयंसेवक आयुष्य भगत, पल्लवी चौधरी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी आणि रासेयो स्वयंसेवक प्रतीक सांभे, अमन पजाई, रुद्रेश चव्हाण, चैतन्य रोडगे, सुमित मुंदाने, गायत्री गोलाम,आकांक्षा तायडे, गणेश फडात व उपस्थित २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग देत उपस्थिती लावली. हर्ष माकोडे, पूजा सोनोने व वैष्णवी सोलव यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तसेच प्रफुल डोरले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उप-प्राचार्य प्रा. पि व्ही खांडवे यांचे मार्गदर्शन लभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.