४५ तोळे सोन्यासह २८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक, पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

32

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.8ऑक्टोबर):-नाशिक शहरात व परिसरात झालेल्या घरफोडी तसेच लुटमार यांच्या तपास पोलीस करत असतानाच अंबड पोलीसांनी घरफोडी च्या दोन गुन्ह्यात चार संशयित आरोपी ना अटक करण्यात येवून ४५तोळे सोन्याचे दागिने व २८लाख ५०हजार रूपये हस्तगत करण्यात यश आले आहे, याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात तिडके कॉलनीतील एका घरफोडीचा तपास सुरू असतांना सापडलेल्या चौघा अट्टल घरफोड्यांना अटक करुन अंबड पोलिसांनी ४५ तोळे सोन्यासह रोख रक्‍कम असा २८ लाख ५० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडून आणखीही काही घरफोड्या आणि फसवणूकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसानी वर्तवली आहे.

याबाबत माहिती अशी की, तिडके कॉलनीतील आनंद गोविंद रायकलाल(वय ६२, रा.वाईड अर्चिड) यांच्या घरी दि.१६ ऑगस्ट २०२२ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन ३२ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.याबाबत अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दि.३०.९.२०२२ रोजी दाखल झाला होता. या चोरीचा तपास करत असतांना अक्षय उत्तम जाधव(वय २६, रा.दत्तनगर, अंबड), संदिप सुधाकर अल्हाट(वय २४, रा.कांबळेवाडी भिमनगर, सातपूर), बाबासाहेब गौतम पाईकराव(वय २८,रा.भीमनगर, सातपूर) आणि विकास प्रकाश कंकाळ(वय २१, रा.कांबळेवाडी, सातपूर) या आरोपींकडून तब्बल १६ लाख रुपये किंमतीचे विविध घरफोड्यांमध्ये चोरलेले सोन्याचे ३२ तोळे दागिने आणि सोने विकून आलेली रक्‍कम ६५ हजार रुपये असा मुद्देमाल जप्‍त केला.

तसेच अशोक चिमाजी ठाकरे(वय ४२, रा.बालाजी अपार्टमेंट, महालक्ष्मीनगर, अंबड) यांच्या मुलीचा अजाणतेपणाचा फायदा घेऊन आकाश संजय शिलावट(रा.नाशिकरोड) याने तिच्याकडून १२.५० तोळे सोन्याचे दागिने फसवून हस्तगत केले होते. याबाबत आकाश शिलावट विरोधात अंबड पोलिस ठाण्यात २०.९.२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ६ लाख रुपये किंमतीचे सोनेदेखील अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रमाणे एकूण ४५ तोळे सोन्यासह २८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी जप्‍त केला आहे.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिस नाईक उमाकांत टिळेकर आणि कॉन्स्टेबल योगेश शिरसाट यांना खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, वसंत खतेले, उपनिरीक्षक संदिप पवार, कान्स्टेबल मुकेश गांगुर्डे, संदिप भुरे, प्रवीण राठोड, तुळशीराम जाधव, किरण सोनवणे,हेमंत आहेर, राकेश राऊत, मच्छिंद्र वाघचौरे, जनार्दन ढाकणे, प्रशांत नागरे, मोतीराम वाघ, पोलिस नाईक किरण गायकवाड आदींच्या पथकाने सापळा रचून गुन्हा उघडकीस आणला आहे.

याबद्दल त्यांचे पोलिस आयुक्‍त जयंत नाईकनवरे, उपायुक्‍त विजय खरात, सहाय्यक आयुक्‍त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निंबाळकर आदीनी अभिनंदन केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सह्हायक पोलिस निरीक्षक खतेले,पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, कॉन्स्टेबल नेहे आणि ढेरंगे हे अधिक तपास करत आहे.