बेलुरकर यांचे कारंजा येथे १५ ऑक्टोबरला व्याख्यान

13

🔹मानवता प्रतिष्ठान कारंजा तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियूष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.8ऑक्टोबर):-विविध संस्कारक्षम विचारांची देवाणघेवाण व्हावी या चांगल्या हेतूने कारंजा शहरात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या मानवता विचार प्रतिष्ठाणच्या वतीने व्याख्यानमाला आयोजन करण्यात आले आहे.

१५ ऑक्टोबर २०२२ ला सायंकाळी ६ वाजता जयस्तंभ चौक परिसरात व्याख्यानमालिकेचे पहिले पुष्प राष्ट्रसंताची राष्ट्रक्रांती याविषयावर संतसाहित्याचे अभ्यासक माणिकदासजी बेलूरकर गुंफणार आहे.

मानवता विचार प्रतिष्ठाण कारंजाच्या वतीने आयोजित व्याख्यान प्रसंगी उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मानवता विचार प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.