राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात मॅरेथॉन संप्पन

32

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.22ऑक्टोबर):- गांधी सेवा शिक्षण समिती संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व शारिरिक शिक्षण विभागाच्या वतीने ‘फिट इंडिया ‘ या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालय ते सेंटक्लारेट शाळेपर्यंत मॅरेथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ प्रफुल्ल बनसोड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले आपले आरोग्य ही खरी संपत्ती आहे, वर्तमान काळातील जीवघेणे आजार हे आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे उद्भवले आहे..

दररोज विद्यार्थ्यानी 30 ते 50मिनिटे व्यायाम करावा. या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा कार्तिक पार्टील वाणीज्य विभाग प्रमुख डॉ हरेश गजभिये,रासेयो विभागीय समन्वयक प्रा पि.व्ही.पिसे,प्रा.डॉ. राहांगडाले,डॉ. कामडी प्रा. पोपटे, शारिरिक शिक्षण संचालक प्रा डॉ. मेंदूलकर प्रा नरूले प्रा.चौधरी उपस्थित होते.या कार्यकमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यकम अधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे, आभार प्रा. ड्रॉ. नितिन कत्रोजवार यांनी केले. या कार्यक्रमाला 110रासेयो स्वयंसेवक सहभागी होतें