महाज्योती मध्ये विकासासाठी ओबीसी,विजेएनटी ,एसबीसी संस्थांना प्राधान्य द्या

18

🔸राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर चे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.25ऑक्टोबर):-इतर मागासवर्ग , विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास वर्ग च्या सर्वांगीण विकासासाठी महाज्योतीची या संस्थेची स्थापना राज्य सरकारने केली आहे.ही संस्था स्थापण करण्यामागे उद्देश असा आहे की मागास असलेल्या समाजाला मूख्य प्रवाहात आणुन सर्वांगीण विकास व्हावा.महाज्योती संस्थेने सुद्धा प्रशिक्षण केंद्र ठरवित असतांना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांना प्राधान्य देउण शासण निर्णय निर्गमीत करण्यात यावा.

अन्य कोणत्याही संस्थांना प्राधान्य देऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर चे प्रा. राम राऊत, कवडू लोहकरे, नरेंद्र बंडे , प्रभाकरराव पिसे , ईश्वर डुकरे, राजु लोणारे, रविंद्र उरकुडे,आर.एन बदके ,योगेश ठुणे,अक्षय लांजेवार, रामभाऊ खडसिंगे, राजकुमार माथुरकर,योगेश अगडे जयदेव रेवतकर,मिनाक्षी बंडे आदी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर चे सदस्य उपस्थित होते.