एक दिवसीय धरणा आंदोलनामुळे संबंधित विभागाला धडकी-मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन

16

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.28ऑक्टोबर):- तालुक्यातील १३० शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाला नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी रेटून धरली दिनांक २७ आक्टोंबर रोजी तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले.

या धरणा आंदोलनामुळे संबंधित विभागाने आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले चर्चेत माननीय प्रविण चिडे तहसीलदार साहेब,सीडीसी बॅंक जिवती चे व्यवस्थापक राठोड साहेब, जिवती पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन जगताप साहेब, मंदिप रोडे मनसे जिल्हाध्यक्ष, सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष,हकानी शेख मनसे तालुका अध्यक्ष, सिध्देश्वर सलगर, मटपल्ली ताई महिला तालुका अध्यक्ष, नागेश खांडेकर तालुकाध्यक्ष विद्यार्थी सेना ,दत्ता गायकवाड, इतर कार्यकर्त्या समक्ष चर्चा झाली चर्चेत पीककर्ज मुदतवाढसाठी वरीष्ठाना पत्रव्यवहार करून मागणी करण्यात येईल आणि मुदतवाढ मिळाली की त्वरीत अर्जदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यामुळे एक दिवसीय धरणा आंदोलन समात करण्यात आले या धरणा आंदोलनात अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते