लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट स्पर्धेचे आयोजन

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.31ऑक्टोबर):- लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे युनिट हेड व वरीष्ठ अधिकारीसोबत सर्व कर्मचारी व कॉलोनी सदस्य उपस्थित होते.

काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत ४ टिम सहभागी झाले, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP.

स्पर्धेचा पहिला सामना हे इलेक्ट्रिकल टिम एंव मेकॅनिकल टिम यांच्यात होऊन इलेक्ट्रिकल नि बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच विक्रम सिंग यांना मिळाली. दुसरा सामना हे कमर्शिअल टिम एंव पावर प्लान्ट प्रोजेक्ट (Cppp) यांचात cppp टीमनी बाजी मारली, व मॅन आफ द मॅच अक्षय मिसार यांना देण्यात आले.

दोन्ही सामने हे मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी झाले व यात का माता,बहिनी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे युनिट हेड व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.