“एकता श्रुंखला” अंतर्गत राष्ट्रीय एकता दिवस सामूहिक शपथ कार्यक्रम संपन्न

17

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.31ऑक्टोबर):- येथील प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकद्वारे “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ व्या जयंती निमित्त “एकता श्रुंखला” उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय एकता दिवस सामूहिक शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयीन प्राचार्य डॉ एम एस अली, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थिती मध्ये रासेयो कार्यक्रम अधिकारी आशिष सायवान यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना देत सामूहिक शपथ वाचन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयीन रासेयो विभाग, निशांत केने, योगेश चौधरी तसेच रासेयो स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, उप-प्राचार्य प्रा. पि व्ही खांडवे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.