बाल दिनानिमि लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी वतीने विविध कार्यक्रम संप्पन्न

15

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14नोव्हेंबर):- तालुक्यातील शिवाजी नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळायेथील लॉयन्स गंगाखेड गोल्डसिटी तर्फे बालदिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथेविविध उपक्रम राबविण्यात आले यावेळी या शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा धारण करून लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे सर्व सभासदांचे स्वागत करण्यात आले तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मनोरंजन करण्यात आले तसेच शाळेतली सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच इतर अनेक मनोरंजक कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले
याप्रसंगी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष गोविंद रोडे, सचिव भगत सुरवसे, शिवाजीनगर चे सरपंच विनायक राठोड, सौ.ईंदुमती कदम आवंके लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे संचालक अंबादास राठोड, अभिनय नळदकर, चंद्रकांत गादेवार, धोंडुतात्या शेटे, अनिल साळवे, महेंद्र वरवडे, महेंद्र कांबळे, अतुल सुरवसे, विठ्ठल शिंदे तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते*त्त