घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडतर्फे बालदिवस उत्साहात साजरा -उषाताई आगदारी

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14नोव्हेंबर):- घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडतर्फे वार्ड क्र.२ सत्यशीव गुरुदेव सेवा मंडळ सभागृहात यंग चांदा ब्रिगेड अध्यक्ष तसेच मा.आ.किशोरभाऊ जोरगेवार यांचा सुचनेनुसार बालदिवस मनविण्यात आला.गोरगरीब गरजु विद्यार्थांना नोटबुक कंपास व इतर साहित्य वाटप करण्यात आले.बहुजन आघाडीच्या अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी यांनी मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत. कोणत्याही देशाच्या विकासासाठी मुलांचा विकास खूप महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत मुलांना चांगले राहणीमान आणि चांगले शिक्षण देणे ही समाजाची आणि देशाची जबाबदारी आहे.

या भावी कलागुणांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी, भारत दरवर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करतो. बालदिन हा मुलांचा राष्ट्रीय सण आहे. या सणासाठी राष्ट्रीय सुट्टी नाही. पण तो देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने मुलांना विशेष वाटले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये मुलेही सहभागी होतात आणि त्यांचा वाढदिवस म्हणून बालदिन साजरा करतात.

बालदिनाविषयी मुलांमध्ये जेवढा उत्साह आहे, तेवढेच त्याचे महत्त्व देशात आणि जगात आहे. बालदिनाबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाने जाणून घेतल्या पाहिजेत.असे आपले मनोगत व्यक्त करण्यात आले.यावेळी बहुजन महिला आघाडी शहर अअध्यक्ष सौ.उषाताई आगदारी,शहर संघटन विलास वनकर, महिला सहयोगीती विजया बंडेवार, जिल्हापरिषद प्रमुख बारसागडे सर,प्रवीण वनकर, मेश्राम मॅडम, गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष नीळकंठ मधुकर नांदे व परिसरातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.