मराठी पञकार परिषदेच्या अभूतपूर्व अधिवेशनला उपस्थित रहा – प्रा. राजेंद्र बरकसे

31

✒️बीड,जिल्हा प्रतिनीधी(नवनाथ आडे)

बीड(दि.16नोव्हेंबर):-मराठी पञकार परिषदेच्या पिंपरी – चिंचवड येथे १९ व २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अभूतपूर्व राष्ट्रीय अधिवेशनाला बीड जिल्ह्यातून सर्व पत्रकारां -नी मोठ्या संख्येने सहभागी होवून अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार तथा दै. झुंजार नेता प्रतिनिधी प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले आहे. 19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी -चिंचवड पुणे येथे होणाऱ्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी सध्या जोरदारपणे सुरू असून या अधिवेशनात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची जन्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थिती लावणार असून सर्व तालुक्यात याची जोरदार तयारी सुरू आहे .

जिल्ह्यातून शेकडो पत्रकार या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थिती लावतील अशी स्थिती आहे. आष्टी, पाटोदा, आंबेजोगाई, परळी, धारूर, केज, माजलगाव, गेवराई, शिरूर, वडवणी, बीड येथे पत्रकारांनी यासाठी नोंदणीही केली असून बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त पत्रकार या अधिवेशनास उपस्थित राहावे व एस. एम. देशमुख यांच्या पाठिशी जिल्ह्यातील पत्रकार एकमुखीपणे उभे असल्याचे सिद्ध करणार आहेत .

या अधिवेशनाच्या तयारी साठी राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, सोशल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे , जिल्ह्यातील विशाल सांळूके ,सुभाष चौरे विलास डोळसे, जितेद्र सिरसट, दत्ताञय आंबेकर, सुभाष नाकलगावकर, हरीश यादव, विजय आरगडे सचिन पवार, गेवराई पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, अय्युब बागवान, गणेश क्षीरसागर ,सुभाष सुतार, सचिव दिनकर शिंदे, कैलास हादगुले,जुनेद बागवान, भागवत जाधव , सखाराम शिंदे, वैजिनाथ जाधव ,प्रसाद कुलकर्णी, सुशील टकले, शेख इरशाद आदी परिश्रम घेत आहेत.