मुखरे चौकात विशाल घाटेवर अज्ञाताकडून अंधाधुंद गोळीबार

61

🔹चार संशयत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

🔸भर दिवसा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण

🔹गोळीबाराने पुन्हा एकदा शहर हादरले
__________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.16नोव्हेंबर):-नाईक चौकातून मुखरे चौकात दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अंधाधून गोळीबाराने पुसद शहर पुन्हा एकदा हादरले आहे. बुलेटने कामानिमित्त जात असलेल्या युवकावर स्कुटीवर आलेल्या दोन अज्ञात बंदुक धाऱ्यांनी अंधाधून गोळीबार केला. दोन अज्ञात बंदुक धाऱ्यांनी युवकावर फायरिंग करून विरूद्ध दिशेने प्रसार झाले आहे. गोळीबारात नवल बाबा वार्डात राहणारा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथे अधिक उपचार सुरू झाला आहे.शहर पोलिसांनी घटनेच्या काही तासातच चार संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे.

विशाल विश्वनाथ घाटे वय ३७ रा. नवल बाबा वार्ड असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की विशाल हा त्याचे बुलेट क्र‌.एमएच २९,एपी ९६३२,ने नाईक चौकातून मुखरे चौकाकडे कामानिमित्त सकाळी साडेअकरा वाजता दरम्यान जात होता. दरम्यानच्या वेळेला दोन अज्ञात बंदूक धाऱ्यांनी विरुद्ध दिशेने येऊन विशालवर चार राऊंड फायर केले. त्यापैकी एक राउंड फायर त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला लागल्याने तो गंभीर जखमी झाला.जखमी झालेला विशालने बुलेट गाडी सोडून थेट शहर पोलीस स्टेशन कडे धाव घेतली.अशावेळी दोन अज्ञात बंदूक धाऱ्यांनी विशाल घाटे शहर पोलीस स्टेशनकडे पळत असल्याचे पाहून विरुद्ध दिशेने पसार झाले.शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पोलीस वसाहतीच्या मागील बाजूस गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोट बॉक्स
तो किर्त्या गोळीबारात सुत्रधार

भर दिवसा गोळीबार झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षकाला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.त्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच घटना घडल्याने पोलिसांची चांगलीच कान उघडनी केली.शहर पोलीस स्टेशनच्या डिबी पथकांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. गोळीबारातील किर्ती रावल हा एक गोळीबारात सामिल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली असून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकासमोरच माहिती घेतल्या जात आहे.