सावित्रीच्या लेकीची उंच भरारी !…..

21

🔸ऐश्वर्या शाम काबरा एम.फार्मसीत विद्यापीठात प्रथम !…..

🔹ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांवर चला – राहुलजी खताळ [ पोलीस निरीक्षक ]

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.16नोव्हेंबर):- आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या एम.फार्मसी विभागाचा निकाल लागला. द्वितीय वर्ष फार्माकोग्नोसी शाखेतून धरणगावातील ऐश्वर्या शाम काबरा 9.93 सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठात प्रथम आली.

धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी.आय.राहुलजी खताळ यांनी ऐश्वर्या च्या घरी जाऊन नेताजी रोड येथे भेट दिली व तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.सोबत कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, पी.एस.आय अमोल गुंजाळ, गोपनीय अधिकारी मिलिंद सोनार, समाधान भागवत, आजोबा रमेश काबरा, वडील श्याम काबरा, आई डॉ.अर्चना काबरा, गोकुळ काबरा, लकी काबरा, इच्छेश काबरा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इच्छेश काबरा यांनी केले तर आभार लकी काबरा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले मनीष चौधरी, ओम कोळी, अरविंद चौधरी, गौरव चौधरी, प्रेम ठाकरे, रोहित चौधरी प्रथमेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले .