काका-पुतणे बसले आमरण उपोषणाला

25

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16नोव्हेंबर): -अतिदुर्गम भाग म्हणुन ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीची तात्काळ नियुक्ती करा म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड व विशाल राठोड दोन्ही काका-पुतणे आज दिनांक १६-११-२०२२ पासून जिवती येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

कारण डी. एच. ओ. साहेब जि. प.चंद्रपूर यांना जय विदर्भ पार्टीच्या वतीने वारंवार निवेदने देऊन सुद्धा आमच्या मागणीला दुर्लक्ष करीत आहे.दि:- ०७-११-२०२२ ला निवेदन देऊन जिवती प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पूर्ण वेळ दोन वैद्यकीय अधिकारी ची तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी केली होती कारण पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे जिवती तालुक्यातील सर्व सामान्य रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,व सामान्य रुग्ण दवाखान्यात गेले असता वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्या रुग्णाला गडचांदूर किंवा चंद्रपूर ला रेफर केले जाते, जय विदर्भ पार्टी तर्फे डी. एच. ओ. साहेब चंद्रपूर यांना वारंवार विनंती व अर्ज करूनही आमच्या मागणीला दुर्लक्ष करीत आहे,म्हणून आम्ही काका-पुतणे आज पासून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही व वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू होणार नाही तोपर्यंत उपोषणाला बसून राहणार.