अंतर्गत जाणीव जनजागृती अभियान येवला बस स्थानक याद्वारे पथनाट्य संदेश देण्यात आले

63

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.18नोव्हेंबर):-आज येवला तालुक्यात मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या अंतर्गत जाणीव जागृती अभियान पटनाट्य पर त्याचप्रमाणे संस्थेचे जिल्हा समन्वयक येवला तालुक्याचे दत्तत्रय दांगट व येवला तालुक्याचे समुपदेशक प्रशांत भाऊ शिंदे व येवला बस स्थानक कामगार सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पटनाट्य टीमने कोविड 19 लसीकरण करण्याचे पहिला डोस दुसरा डोस याचे महत्त्व पटवून नागरिकांना नाट्याच्या माध्यमातून पटवून सांगितले त्या प्रमाणे डेपो मॅनेजर हाडपे सर मुरुडणाखे सर , समुपदेशक प्रशांत भाऊ शिंदे, यांनी या ठिकाणी उपस्थित राहून संस्थेचे पथनाट्य टीमचे आभार व्यक्त केले.

तसेच येवला बस स्थानक एसटी महामंडळ परिवार अधिकारी व पदाधिकारी येवला बस स्थानक गोरगरिबांना नेहमी सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड शशिकांत जगताप समाज कार्यकर्ते भाऊसाहेब गरुड त्यांच्यासह इतर कामगारांनी पथनाट्य संस्थेचे व पटनाट्य टीमचे समुपदेशक प्रशांत भाऊ शिंदे यांचे या सर्व टीमचे आदी मान्यवरांचे उपस्थित राहून संस्थेचे आभार मानण्यात आले