दावडी, राजगुरुनगर येथील विद्यार्थी कराटे स्पर्धेमध्ये यश

29

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि.२५नोव्हेंबर):-रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले 14 वर्ष वयोगटात मुले ,14 वर्षे व गट मुली, व 17 वर्ष वयोगट मुली या स्पर्धा गटांमध्ये कराटे स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय,तृतीय क्रमांक प्राप्त करत विद्यालयाची क्रीडा स्पर्धातील यशस्वी घोडदौड कायम ठेवली .विद्यार्थ्यांचे यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अंकुश केंगारे, पर्यवेक्षक महादेव आगम ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य ,सरपंच ,उपसरपंच व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

क्रीडा संकुल खेड येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगट मुले या गटात पृथ्वीराज सचिन सातपुते -प्रथम क्रमांक ,साई काळूराम शिंदे -द्वितीय क्रमांक,14 वर्षे वयोगट मुली या गटात द्वितीय क्रमांक कविता वासुदेव चव्हाण ,तृतीय क्रमांक वैष्णवी अनिल येवले ,17 वर्षे मुली वयोगट प्रथम क्रमांक नीलम वासुदेव चव्हाण व जान्हवी संदीप लोणकर प्राप्त केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक सपना गुजर, विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री श्रीकांत घुले ,श्री नानाभाऊ आवारी यांनी मार्गदर्शन केले.

विरोधकांनो, स्वत:ला नपुंसक घोषित करा !