उमरखेड येथे “भारतीय संविधान दिन” उत्सवात साजरा

47

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 26 नोहेंबर):-शहरातील मुख्य डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहारामध्ये “भारतीय संविधान दिन” उत्सवात साजरा करण्यात आला.सर्व प्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण भदंत किर्तीबोधी, हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका) कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतीदुत समिती) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शांताबाई दिवेकर यांनी भारतीय संविधान दिणाबद्दल ची माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले.

नंतर लगेच सम्यक बुद्धविहारा मध्ये त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आले.

यावेळी यशोदाबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, यशोधरा धबाले, सुभद्राबाई पाईकराव, भारताबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, भारतीताई केंद्रेकर,रंजनाबाई आठवले, दीपक इंगोले, शंकरराव दिवेकर तसेच अनेक बालक बालिका उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष तथा पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सामजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर यांनी मानले.

https://www.purogamiekta.in/2022/11/26/55912/