महातपुरी येथील प्रकाश डबडे यांचा अपघाती मृत्यू

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29नोव्हेंबर):-परभणी ते गंगाखेड या रेल्वे मार्गाचे रेल्वेच्या लाईनचे काम चालू असून या रेल्वे लाईनचे विजेचे तार सांभाळण्यासाठी कंपनीने सुरक्षा रक्षक म्हणून युवकांना रोजंदारीवर कामाला लावले आहे. या रोजंदारीवर काम करणाऱ्या युवकांना दोन ते अडीच किलोमीटरचे अंतर सांभाळण्यासाठी दिली असून चोरी होणार नाही याची जबाबदारी या सुरक्षारक्षकावर देण्यात आली आहे. याच बिफोर एस कंपनी मध्ये मागील सहा महिन्यापासून गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील युवक प्रकाश पंडित डबडे वय वर्षे 40 हे पण काम करत होते.

पण 28 नोव्हेंबर रात्री साडेबाराच्या सुमारास प्रकाश डबडे हे आपल्या दुचाकीवरून महातपुरी येथुन शिंगणापूर पॉईंट कडे जात असतानाच ताडपांगरी फाट्यावर उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला गाडी आदळुन प्रकाश डबडे हे जखमी झाले.

रात्री साडेबाराच्या सुमारास अपघात घडल्याने घटनास्थळी कोणतीही गाडी थांबण्यास तयार नव्हती. घटनास्थळापासून जवळच रेल्वे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा पॉईंट असून त्या ठिकाणाहून प्रकाश डबडे यांचे सहकारी यांना घटनेची माहिती कळताच तात्काळ दुचाकी घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी प्रकाश डबडे हे जखमी अवस्थेत मदतीची अपेक्षा करत पडले होते सहकारी मित्राने मदतीसाठी 108, 112 या नंबर वर कॉल केले घटनेची माहिती जवळच्या दैठणा पोलीस ठाण्याला कळवली मदत कार्य घटनास्थळी येण्यास वेळ लागल्या मुळे त्यास वेळेवर मदत केली असती तर कदाचित प्रकाश डबडे यांचे प्राण वाचले असते.

घटना घडल्यानंतर अर्धा ते एक तासांनी मयत प्रकाश डबडे यांचा भाऊ गाडी घेऊन घटनास्थळी आले प्रकाशला जखमी अवस्थेत परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी दाखल केले उपचार चालू असतानाच प्रकाश दबडे मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जर वेळेवर मदत केली असती तर प्रकाशाचे कदाचित प्राण वाचले असते.